LIVE TVदेशब्रेकिंग न्यूज़राज्य

अजहर हानिफ शेख (एबीएस) यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहिर

 

श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संरक्षण अँड अँटी करप्शन ब्युरोचे महाराष्ट्र अध्यक्ष, युवा नेते अजहरभाई शेख यांना भारतीय लहुजी सेनेच्या वतीने देण्यात येणारा डॉ. अब्दुल कलाम समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आपल्या कामातून वेगळाच ठसा उमटविणारे, राज्यात परिचित व नेहमी चर्चेत असणारे अजहरभाई शेख हे नेहमी सामाजिक कामांमध्ये अग्रेसर आहे. पेरामेडिकल सायन्स मध्ये उच्च शिक्षित असल्यामुळे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करणे, गरजूंना वैद्यकीय सुविधेपासून ते आवश्यक किराणा पुरवण्याचे व कोरोना काळात अल्पदरात आर.टी पी.सी.आर टेस्टची सुविधा उपलब्ध करून १०० पेक्षा जास्त गरीब कुटुंबाचे पालकत्व स्वीकारण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे. तसेच नगरपालिकेकडून वेळोवेळी परिसरातील स्वच्छता करून घेणे, फवारणी, गटारी साफ- सफाई, पाण्याचे व विजेचे प्रश्न सोडविणे आदि कामे करीत आहे. याच कामाची दखल घेता भारतीय लहुजी सेनेच्या वतीने क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जन्मोत्सवानिमित्त दि. ३० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता श्रीरामपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर सदरच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हानिफ पठाण, कायदेशीर सल्लागार रमेश कोळेकर, जिल्हा प्रमुख रज्जाक शेख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रईस शेख, बाळासाहेब त्रिभुवन यांनी दिले आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल युवकातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Viyasmani Tripathi

Cheif editor Mobile no 9795441508/7905219162

Related Articles

Back to top button